पोलिसांना चकवा देऊन बार्शी न्यायालयातून आरोपी पळाला


बार्शी - बार्शीतील सत्र न्यायालयातून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याची घटना आज दुपारी घडली. आनंद काळे (वय 25) असं या आरोपीचं नाव असून तो मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजते. मात्र, शासकीय कामातील अडथळा प्रकरणी आज त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सध्या आरोपी सोलापूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता, वैराग पोलिसांच्या कोठडीत आज दुपारी त्यास सुनावणीसाठी बार्शीतील न्यायालयात आणले असता, पोलिसांना चकवा देऊन त्याने धूम ठोकली. सध्या पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.


Post a Comment

0 Comments