सचिन गायकवाड यांचा बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेशवैराग |

बहुजन समाज पार्टी बार्शी विधानसभा मध्ये दिनांक 13 डिसेंबर रोजी सचिन जी गायकवाड यांचा बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश घेण्यात आला. हा प्रवेश बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव विलासजी शेरखाने यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांची जवळगाव सेक्टर अध्यक्ष त्यांची निवड करण्यात असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे बार्शी विधानसभेचे अध्यक्ष नागेश जी ठोंबरे, उपाध्यक्ष शिरीष कुमार, वैराग शहरा अध्यक्ष ताजोद्दीन ( बाबा ) शेख, बार्शी विधानसभा बीव्हीएफ किशोरजी लोंढे, वैराग शहर प्रभारी सादिक जी पटवेकर, वैराग शहराचे कोषाध्यक्ष आनंदजी नाग टिळक अधिकारीकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments