सिरसाव |
परंडा तालुक्यातील सिरसाव येते ८ डिसेंबर रोजी परांडा-वाकडी- सिरसाव मार्गे बार्शी बस सेवा सुरू करण्यात आली. समस्त ग्रामस्थ सिरसाव यांच्या वतीने लालपरीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. चालक काळे व वाहक कुंभार यांना फेटा, हार घालून महालक्ष्मीचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.
सिरसावसारख्या आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात आज तागायत एसटी बस पहावयास मिळाली नव्हती. सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश चोबे व गजानन पाटील हे सिरसावमध्ये एसटी चालू व्हावी यासाठी २०१८ पासून प्रयत्न करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर परंडा ते बार्शी सिरसाव मार्गे बस सेवा सुरू झाली आहे.
या नवीन सुरू झालेल्या बसमुळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला यांच्यासाठी ही बस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली, तरीसुद्धा तालुक्यातील मोठे गाव बस सुरू व्हावे या प्रतीक्षात होते. अखेर तरुण युवकांनी प्रयत्न करून महामंडळाच्या सहकार्याने बस सेवा सुरू झाली आहे.
0 Comments