सोलापूर जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीद्वारे कोट्यवधींची फसवणूक


सोलापूरात सीसीएच अॅपद्वारे फसवणूक झाल्याची घटना घडल्यानंतर आता क्रिप्टो करन्सीद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी या संदर्भातील तक्रार पोलिस आयुक्तांकडे दिली आहे.

पोलिसात आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये सोनी टिक्स कंपनीचे नाव समोर येत आहे. शंभर दिवसात डबल पैसे देण्याचे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

फसवणूक झालेल्या नागरिकांनी काही सामाजिक संघटनांची संपर्क साधून माध्यमांसमोर म्हणणे मांडले आहे. सोनी टिक्स कंपनीचे संचालक, पार्टनर आणि एजंट यांचे गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखवून शिववर्स क्रिप्टो कॉइनची निर्मिती करून अनेकांना भावनिक करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाधव म्हणाले, या कंपनीच्या माध्यमातून देशभरात जवळपास पाच हजार कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. सोलापुरातही फसवणूक झालेले अनेक लोक असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या संदर्भातील शोध घ्यावा, कंपनीचे बँक खाते सीझ करावे अशी मागणी आम्ही केली आहे.

Post a Comment

0 Comments