अद्ययावत मराठा मंदिर चे काम युद्ध पातळीवर : लवकरच लोकार्पण सोहळा - आमदार राजेंद्र राऊत


बार्शी |

 शहरातील मराठा मंदिरच्या चालू असलेल्या कामाची पाहणी करून आमदार राजाभाऊ राऊत यांनी ठेकेदारांना लवकर व उत्कृष्ट दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांच्या समवेत सदरील कामाची पाहणी केली. बार्शी शहराच्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या मराठा मंदिरच्या वास्तूची उभारणी मोठ्या दिमाखात आणि युद्ध पातळीवर चालू आहे. 

मराठा समाजाची अस्मिता असणारा मराठा मंदिर चा विषय गेल्या अनेक वर्षांपासून  रखडलेला होता. परंतु बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नातून मराठा मंदिर चा जिर्णोद्धार लवकरच होणार आहे.सदरील जागेमध्ये भव्य अशी अध्यायवत वास्तू साकारत असून तिचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे असे राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. यावेळी बार्शी शहरातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments