गुळपोळी येथे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन


बार्शी |

तालुक्यातील गुळपोळी येथे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन सूर्यकांत चिकणे व सत्य साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते,शिबिराचे उद्घाटन सौ रेखा सूर्यकांत चिकणे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

 
सदर शिबिरामध्ये रक्तातील साखर व सर्व आजारावरील , सर्व तपासण्या करून, सर्व रूग्णांला मोफत गोळ्या औषधे देण्यात आल्या. या शिबिराचा गुळपोळीतील व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिरासाठी सुविधा हॉस्पिटल बार्शीचे  डाॅ.विजय दादा खुने,समर्थ अणवेकर,लिंगायत साहेब,अक्षय राऊत,कुंडलिक बारवकर,शकुंतला मोटे,सूर्यकांत चिकणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
       
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी रेखा सूर्यकांत चिकणे,शकुंतला मोटे,कुंडलिक बारवकर,वैभव मोहोळे,सुनिल फुरडे,महेश चिकणे यांनी परीश्रम घेतले तर आभार सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments