६२ वर्षीय सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग, गुन्हा दाखल


पुणे |

सुनेशी अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३२ वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार ६२ वर्षीय सासऱ्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला आणि तिच्या पतीचा वाद झाला होता. ती वेगळी राहत होती. सून ही हिंगणे खुर्द परिसरातील एका मंदिरासमोर थांबली होती. त्या वेळी सासरा तेथे आला. ‘आपल्या समाजात दुसरे लग्न करायची प्रथा नाही. मी तुला सदनिका घेऊन देतो. मुलगा आणि सासूला सांगू नको. मी तुझा सांभाळ करेन’, असे सांगून सासऱ्याने सुनेचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments