परंडा तालुक्यातील तरुणाचे मराठा आरक्षणाबाबत थेट मुख्यमंत्री महोदयांना पत्र


परंडा  |

तालुक्यातील कपिलापुरी येथील तरुणांनी मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
गेल्या ४० वर्षां पासून मराठा समाज आरक्षणाचा लढा देत असून या संबंधीत लाखोंच्या संख्येने ५७ शांतीपूर्ण मोर्चे निघाले तरी देखील हा प्रश्न मार्गी लागलेला नसून आता पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात उभा राहिलेला लढा व होत असलेले मोर्चे ,आंदोलणे,साखळी उपोषणे, आमरण उपोषणे,आदीसह इतर आंदोलने सुरू असतानाच परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथून श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी अध्यक्ष अँड. रणजीत महादेव पाटील या मराठा तरुणाने  थेट नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

तसेच मराठा तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्या याबाबत गांभीर्याने विचार करून मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन आरक्षणाला दिरंगाई न लावता तात्काळ आरक्षण देण्यात यावे असे या पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments