सुर्डीत 'दिव्यरत्न प्रतिष्ठान'कडून किर्तन सोहळा संपन्नवैराग / प्रतिनिधी :

सुर्डी ता.बार्शी येथे दिव्यरत्न प्रतिष्ठान, पिंपळ गल्ली यांनी आयोजित केलेला दत्ता महाराज भोसले यांचा सुश्राव्य किर्तन सोहळा पार पडला. यावेळी माऊली भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मा तात्या डोईफोडे, नंदु महाराज, मोहन सुतार, सुर्यकांत शेळके, ओंकार शेळके, शहाजी शेळके, हरी कुंभार (चोपदार) यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

वारकरी संप्रदायात सेवा करणारे, आराधी मंडळ, सकाळची रामप्रहर फेरी घेणारे व्यक्ती तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे यांचा सत्कार सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दिव्यरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव डोईफोडे व लक्ष्मण शिंदे, संतोष पवार, जुनेद शेख, अभिषेक शिंदे, सुमित दगडे, बालाजी पवार, रामेश्वर शिंदे, आकाश धस, अजय शेळके, मयुरेश डोईफोडे, मदन डोईफोडे, हनुमंत डोईफोडे, नागनाथ वांगदरे, दादा माळी, गोपाळ डोईफोडे, बापु वायदंडे, सुशांत जगताप, अभिनंदन डोईफोडे, योगेश कसबे, गौरव कटकदौंड आदींनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments