धाराशिव - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज 1 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सुमित माने या युवकाला निजामकालीन 1967 पूर्वीच्या नोंदीच्या पुराव्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तहसीलदार शिवानंद बिडवे व प्रवीण पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार न्या.संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीच्या स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने समितीला आढळलेल्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली.
0 Comments