मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या


नगरमधील संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज पहाटे घडली. सागर भाऊसाहेब वाळे (25) असे त्याचे नाव आहे. त्याने घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास लावला. 'आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा' असा उल्लेख चिठ्ठीत केला आहे.

Post a Comment

0 Comments