विद्यार्थ्यांनी शासकीय अथवा खाजगी नोकरी करण्यापेक्षा स्वयंरोजगार सुरू करावा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


सोलापूर |

शहरी अथवा ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे. शासकीय अथवा खाजगी नोकरी करण्यापेक्षा आजच्या तरुण पिढीने आपली आवड व आपल्या गावात अथवा शहराला गरज असलेल्या कोणत्याही एका ट्रेडचे कौशल्य मिळवून आपला स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा. व इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी केले.
         
 मंद्रूप शासकीय आयटीआय मध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संवाद साधला. 
       
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की विद्यार्थ्यांनी  शालेय तसेच महाविद्यालयीन काळातच आपल्याला कोणत्या विषयाचे कौशल्य प्राप्त करायचे आहे. त्याचे ज्ञान घेणे गरजेचे असून त्यावर आधारित आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःसह आपल्या गावाचा विकास साधावा. अत्यंत मन लावून व परिश्रम घेऊन अभ्यास करावा. स्वतःचे आत्मनिरीक्षण करून आपल्या स्वतःमधील उणीव शोधाव्यात व त्यावर परिश्रम घेऊन सुधारणा करावी व कौशल्य आत्मसात करावे. 
        
मेट्रोपॉलिटीन शहरातील तरुण वर्ग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्टार्टअप सुरू करण्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. त्याच पद्धतीने ग्रामीण भागात ही स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी शासकीय आयटीआय तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments