सोलापूर | चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून ; कुऱ्हाडीने गळ्यावर केले वार


सोलापूर – पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेऊन पतीने धारदार कुन्हाडीने मुंडकेच कापल्याची थरारक घटना रविवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी ममनाबाद (ता. अक्कलकोट) येथे सकाळी सहा वाजता घडली. पत्नीचा खून करून पती हा हातामध्ये कुन्हाड घेऊन थेट पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या बसवराज हणमंत बिराजदार (रा. ममदाबाद) याने पत्नी सावित्रा हणमंत बिराजदार (वय २८, रा. ममदाबाद) यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन राहत्या घरात धारदार लोखंडी कुन्हाडीने गळ्यावर वार केला. या हल्ल्यामध्ये सावित्रा बिराजदार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसवराज हणमंत बिराजदार याच्या विरोधात भारतीय दंड साहित्य १८६० चे कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रा बिराजदार यांचे वडील हणमंतप्पा सिद्धरामप्पा इब्रामपुरे (७४, व्यवसाय शेती, रा. खानापूर ता. जि. कलबुर्गी, राज्य कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंडित चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments