सोलापूर | दोन हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या ताब्यात



सोलापूर - २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उप-निरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीकांत बलभीम जाधव नेमणुक पोलीस उप-निरीक्षक नेमणूक सोलापूर शहर वाहतुक शाखा असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उप- निरीक्षकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे भाऊ हे दि. १०/१०/२०२३ रोजी सोलापूर शहरातून त्यांच मोटर सायकलवरुन ट्रीपलसीट प्रवास करीत असताना यातील लोकसेवक श्रीकांत जाधव, पद पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदार यांचे भाऊ यांना सोलापूर शहरातील जोडबसवन्ना चौक येथे अडवून त्यांचेकडील मोटर सायकल सोलापूर शहर वाहतुक शाखा उत्तर येथे आणून जमा केली. 

त्यानंतर यातील तक्रारदार हे सदरची मोटार सायकल सोडण्याकरीता यातील लोकसेवक श्रीकांत जाधव, पद पोलीस उप-निरीक्षक, यांना भेटले असता लोकसेवक जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे २,७००/- रुपये रक्कमेची मागणी करुन त्यापैकी ७००/- रुपये दंडाची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २,०००/- रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतःस्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आले असुन जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments