सोलापूर । लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले नाव



सोलापूर |

 एकीकडे दसऱ्याची धामधूम, तर दुसरीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे  यांनी मोठी घोषणा केली आहे. “मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. “दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतं असतो. मात्र योगायोगाने मी आज सोलापुरात आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली, त्या घटनेचा इतका जयजयकार झाला की त्या घटनेनुसारच आज देश चालतो आहे. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आता कुठल्या पक्षाला राजकारणदेखील करता येत नाही हे आता सिद्ध झालं आहे.दरम्यान यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयीदेखील भाष्य केलं. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदे ह्याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments