'तू मराठ्यांचं रक्त पिऊन...'; जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल


जालना |

मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनासाठी पैसा कुठून येतो असा प्रश्न राज्यातील मंत्री आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नाला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जाहीर सभेमधून उत्तर दिलं आहे. थेट छगन भुजबळांच्या नावाचा उल्लेख न करता अगदी आपल्या गावरान शैलीत मनोज जरांगेंनी टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्याला समज द्यावी असंही जरांगे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

केंद्र आणि राज्य सरकारला मनोज जरांगेंनी इशारा दिला. "केंद्र आणि राज्याला मी सांगतो हे मराठ्यांचं आग्यामोहळ शांत आहे. एकदा का हे आग्यामोहळ उठलं तर आरक्षण घेतल्याशिवाय ते राहणार नाहीत.  राज्य आणि केंद्रालाही विनंती आहे. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करुन देशाला अन्नधान्य पुरवतो. त्याची लेकरं आरक्षणापासून वंचित राहता कामा नये. माझंही लेकरु नोकरीला लागलं पाहिजे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. सरकारने तातडीने मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत," असं जरांगे म्हणाले.

Post a Comment

0 Comments