कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या, पहाटेच्या सुमारास गळफास घेत संपवलं जीवन


पुणे |

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या  कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या घेत जीवन  संपवलं आहे. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेनी गळफास घेऊन आत्महत्या  केली आहे. 

आरोपी जितेंद्र शिंदे याने स्वत:च्या कपड्यानी गळफास लावून घेतल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.  घटनेची माहिती मिळताच अधिकारी पोहचले आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments