विवाहितेला प्रेमात अडकून लैंगिक शोषण फोटो व्हायरल करण्याची धमकी, महिलेचे आत्महत्या


नागपूर |

नागपूर जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना उघडकीला आहे.
विवाहितेला प्रेमात अडकवून एका व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले. तिचे अश्लील फोटोही घेतले. लग्नाबाबत विचारले असता स्पष्ट नकार दिला. दबाव टाकला असता फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. शेवटी त्रस्त होऊन विवाहितेने गळफास लावत आत्महत्या केली.

पोलिसांनी २४ वर्षीय पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे. हर्षल सागर कोटांगळे (वय २७ रा. जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिला मुलगाही झाला. मात्र, नंतर पती-पत्नीत कौटुंबिक कारणातून वाद होऊ लागले. दोन वर्षांपूर्वी तिने पतीचे घर सोडले आणि भाड्याने खोली करून राहू लागली. जवळपास वर्षभरापासून आई-वडील आणि भावासोबत अजनी ठाण्यांतर्गत राहत होती. ती मेडिकल चौकाजवळील ट्रिलियम मॉलमध्ये काम करीत होती. या दरम्यान तिची मैत्री हर्षलशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

हर्षलही विवाहित आहे. त्याने पत्नीपासून घटस्फोट घेत तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. जुलै २०२२ मध्ये तिचा हर्षलशी वाद झाला. काही दिवसानंतर तिने फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भावाने विचारपूस केली असता हर्षल लग्न करण्यास नकार देत असून, तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे सांगितले. २० जुलै २०२३ च्या दुपारी पीडितेने राहते घरी बेडरुमचे दार आतून बंद करीत गळफास लावला.

Post a Comment

0 Comments