सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…; दहीहंडी उत्सवात गौतमीच्या पाटीलच्या डान्सची चर्चा


आज दहीहंडीचा सण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. अशातत ठिकठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे.  . गोविंदा पथक रचत असलेले थरावर थर नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू थर आहेत. अशातच कलाकारांनाही या दहीहंडी उत्सवाला आमंत्रित करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री आणि गायकांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीनेही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला डान्सर गौतमी पाटील हिने हजेरी लावली आहे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…, या गाण्यावर तिने परफॉर्मन्स सादर केला.

गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा डान्सही अनेकांना आवडतो. गौतमी पाटीलची एक झलक दिसावी म्हणून चाहते प्रयत्न करत असतात. अशात आज दहीहंडी उत्सवात गौतमी हजेरी लावणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी हजेरी लावली नसती तरच नवल! गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम… या गाण्यावर गौतमीने परफॉर्मन्स सादर केला. तेव्हा प्रेक्षकांनीही तिच्यासोबत या गाण्यावर ठेवा धरला. 

Post a Comment

0 Comments