एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखांची फसवणूक



मुंबई |

अलिबागमध्ये एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचे वृत्त असे की,फिर्यादी अभिजित वणिरे रा. कोल्हापूर यांच्या मुलीला अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश घ्यायचा होता.

याबाबत आरोपी पंकज मेहता, अनिल मंडल रा. पश्चिम बंगाल, नारायण खरमोडे यांनी फिर्यादी वणिरे यांच्याशी संपर्क करून तुमच्या मुलीला प्रवेश मिळवून देतो यासाठी काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. वणिरे यांनी मुलीचा प्रवेश होणार या आनंदात आरोपीवर विश्वास ठेवून २७ सप्टेंबर रोजी ३२ लाख ५० हजार रुपये अलिबाग येथील रवी किरण हॉटेल मध्ये देण्यात आली.

अभिजित वणिरे यांनी अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर मुलीचा प्रवेश कन्फर्म झाला नसल्याचे कळले. आपण फसलो गेल्याचे कळल्यावर वणिरे यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन करून तक्रार दाखल केली. 

Post a Comment

0 Comments