धाराशिव | ४ हजारांची लाच घेणाऱ्या लेखा सहाय्यकासह सेवानिवृत्त अभियंत्यास अटकधाराशिव |

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिपाई असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याची शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये काढून देण्यासाठी पंचायत समितीच्या वरिष्ठ लेखा सहाय्यकासह एका सेवानिवृत्त अभियंत्याने संबंधित महिलेच्या मुलाकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. 

यातील एका ३० वर्षीय तक्रारदार यांची आई या जिल्हा परिषद शाळेतून शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण  व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये रक्कम तक्रारदार यांच्या आईच्या खात्यावर जमा करून देण्यासाठी धाराशिव पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक लेखा मिलिंद सुर्यकांत कांबळे (वय- ४५ वर्षे, वर्ग -३), हनुमंत गोपाळ पवार (वय- ६९ वर्षे) सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, रा. काकडे प्लॉट धाराशिव ( खाजगी व्यक्ती ) यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम दि.२८ सप्टेंबर रोजी आरोपी कांबळे यांनी लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली.  या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments