मुंबई|
कर्नाटकातील बागलकोट येथे परवानगी न घेता उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हटवण्यात आला.
यामुळे शिवप्रेमींमधून कर्नाटक सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेचे महाराष्ट्रातदेखील पडसाद उमटले आहे. विशेष करुन भाजपने याविरोधात रान उठवलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी कर्नाटक सरकारवर टीका करत एक पत्र लिहलं आहे.
0 Comments