राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात


मुंबई |

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना अचानक निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला. राज्य सरकारच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थी संघटनांकडून राज्य सरकारवर टिका करण्यात आली आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

सिनेट निवडणूक स्थगितीचा युवासेनेकडून निषेध नोंदविण्यात आला. सरकारला पराभवाची भीती वाटते त्यामुळे हा निर्णय झाला. राज्यात लोकशाही संपवण्याचं काम सुरु असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. 

मागच्यावर्षी सिनेटची निवडणूक झाली नाही, यावर्षी निवडणूक अपेक्षित होती. मतदार नोंदणी झालेली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला, असे त्यांनी सांगितले. आम्ही अन्य पक्ष निवडणूक लढवत होतो, काल स्थगिती आल्यानंतर सर्वांना प्रश्न पडलाय, नक्की असं काय घडलं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बैठकीनुसार निवडणूक रद्द झाल्याचे विद्यापीठाच्या पत्रकात म्हटले आहे. मग ही बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? कुणाच्या घरी झाली? बैठकीत कोण कोण होतं? असे अनेक प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले. या सभेची माहिती कुणालाच नाही. परिपत्रकात शासन आदेश असा उल्लेख आहे. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू यांचे फोन बंद येत असल्याचे देखील ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठात युवासेनेचे वरुण सरदेसाई दाखल झाले. सिनेट निवडणूक स्थगित केल्याचा जाब ते कुलगुरुंना विचारणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंचं पत्र कुलगुरूंना देण्यात येणार आहे.दरम्यान वरुण सरदेसाईंना विद्यापीठात सोडण्यात आल्यावर बहुजन विकास आघाडी, छात्रभराती सम्यक आघाडीच्या विध्यार्थ्यांनीही आत सोडण्याची मागणी केली. यानंतर त्यांनाही सध्या आत सोडण्यात आले.

Post a Comment

0 Comments