परांडा | तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा ; या संघाने मिळवला प्रथम क्रमांक


परांडा |

जिल्हा परिषद प्रशाला परांडा १४ वर्षाखालील मुले हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झाले. अतिशय अटीतटीच्या सामन्यांमध्ये ग्लोबल इंग्लिश स्कूल उपविजयी तर जिल्हा परिषद प्रशाला परांडा मुले विजयी ठरलेली आहेत. सदर स्पर्धेमध्ये परंडा प्रशालाचा संघनायक घनश्याम लाल कडायत आहे. संघनायक हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

 या संघास मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक शशी माने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक इंगळे व शिक्षक मिसाळ सर, खरात सर, पखाले सर, शिंदे सर, श्रीमती गाडगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी संघाचे संपूर्ण तालुक्यातून अतिशय कौतुक होत आहे. जिल्हा परिषद प्रशाला मुलांचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे.

Post a Comment

0 Comments