डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची २७ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार कार्यशाळामुंबई येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारणी, विभागीय कार्यकारणी व महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची एक दिवसीय कार्यशाळा, पुणे येथे रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी दिली. 
   राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्य सचिव नंदकुमार सुतार, राज्य संघटक श्यामल खैरनार ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य सहसचिव संजय कदम ,कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण ,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील ,राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य समन्वयक चंद्रकांत भुजबळ,  राज्य समन्वयक केतन महामुनी ,राज्य सल्लागार मयूर गलांडे,प्रशांत माने,अमित इंगोले, रोहन नलावडे यांची उपस्थिती होती.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्वात मोठी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून प्रसार माध्यमातील संपादक पत्रकारांच्या विविध मागण्या या शासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या .यामधील काही मागण्या मान्य करून त्यावर कारवाई देखील सुरू आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना संघटना वाढीसाठी योग्य ती दिशा मिळावी यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी राजा माने यांनी दिली यावेळी राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी ,सदस्य विभागीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments