“जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर…”, स्मृती इराणींचं राहुल गांधींवर टीकास्र!काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत आहे, असं विधान राहुल गांधींनी केल्यानंतर त्यावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या भाषणावर तीव्र आक्षेप घेतला. यासंदर्भात भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी बोलताना राहुल गांधींनाच प्रतिप्रश्न केला आहे.

 “देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेच्या हत्येबाबत बोललं गेलं. काँग्रेस पक्ष यावर टाळ्या वाजवत होता. यातून अवघ्या देशाला संदेश दिला की कुणाच्या मनात गद्दारी आहे. मणिपूर विभाजित नाही, तो आमच्या देशाचा एक भाग आहे. डीएमकेच्या एका सदस्याने तमिळनाडूत म्हटलं की भारत म्हणजे फक्त उत्तर भारत.राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर त्यांचं वक्तव्य फेटाळून दाखवावं”, असं थेट आव्हान स्मृती इराणींनी दिलं.

“काँग्रेस पक्षाच्या एका नेत्यानं काश्मीरमध्ये जनमताबाबत थेट कोर्टात विधान केलं. जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर या देशाला त्यांनी सांगावं की काश्मीरला देशापासून वेगळं काढण्याच्या कारस्थानात काँग्रेसच्या त्या नेत्याचं विधान का आहे? तुम्ही अजिबात ‘इंडिया’ नाहीत”, असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments