सोलापूर |
एकटी पाहून फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करून घरात घुसला अत्याचार धाडसाने रात्री उठून आईला सांगितला सारा प्रकार सोलापूर येथे घडला आहे, फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करुन आलेल्या एका नराधमानं घरात कोणी नसल्याचं पाहून घराचे दार बंद करुन नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.
याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदला आहे. याप्रकरणी नराधमाला अटक केली आहे. शनिवारी पिडित मुलीची आई कामासाठी बाहेर गेली होती. पिडितेच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती फाटलेला शर्ट शिवायचा आहे म्हणून घरात आला. पिडितेने त्याला आई कामाला गेली आहे परत या असे सांगितले. याचवेळी त्याने घराचे दार बंद करुन या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट आईला सांगितली तर तुला खल्लास करतो म्हणून धमकी दिली. दुपारी दोनच्या सुमारास पिडितेचे आई घरी आली. तेव्हा तिने घाबरुन काही सांगितले नाही.
रात्री १० वाजता झोपेतून उठून तिने रडत सारा प्रकार आईला सांगितला. रविवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या नातलगाशी चर्चा करुन पिंडिता व तिच्या आईने जोडभावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असुन,अधिक तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.
0 Comments