अजितदादा गटाकडून निवडणूक लढवणार का?, अनिल देशमुख यांचं मोठं विधान


राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कटोलमधून अजितदादा गटाच्या तिकीटावर लढणार आहेत. असा दावा अजितदादा गटाचे प्रशांत पवार यांनी केला आहे. प्रशांत पवार यांच्या या दाव्यावर अनिल देशमुख यांनी विधान केलं आहे. देशमुख यांनी मनातील गोष्ट स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे नागपुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच काटोलची निवडणूक देशमुख यांच्यासाठी जड जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजितदादा गटात जाणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. प्रशांत पवारला समजायला पाहिजेत, दुनियेला माहितीय की, मी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा आणि शेवटपर्यंतसोबत राहणारा आहे. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. सगळ्यांना माहितीय मी शरद पवार साहेबांचा खंदा समर्थक आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. देशमुख यांनी शरद पवार यांच्या गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केल्याने नागपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कटोलची जागा भाजप स्वत:कडे ठेवणार की अजितदादा गटाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Post a Comment

0 Comments