बॅनरवर शरद पवारांचे फोटो वापरू नका, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांच्या सूचना


मुंबई |

 राष्ट्रवादीतून फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना शरद पवारांनी आपल्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरण्यात येत नव्हते. अखेर शरद पवार यांनी कोर्टात जाऊ म्हटल्यावर शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. 

अजित पवारांनी बंड केल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात फोटोवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसले. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जात होता. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात होता.पण स्वतः शरद पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिला. फोटो वापराल तर कोर्टात खेचेन असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला. त्यानंतर अजित पवार गटाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फोटो न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments