आमदार बबनदादा शिंदे यांना कॅबिनेट मंत्री करावे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी


माढा |

मागील ३० वर्षापासून माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले लोकप्रिय आमदार बबनराव शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेण्यात यावे व राज्याच्या सेवेची संधी मीळावी अशी आग्रही मागणी, माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन सुहास काका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माढा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील आदी मान्यवरांनी अजितदादांशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे की आमदार बबनराव शिंदे यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, पुढे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, दूध संघाचे चेअरमन व 1995 ला अपक्ष तर 1999 पासून आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच वेळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. 

जिल्ह्यात व तालुक्यात झालेली हरितक्रांती, धवल क्रांती, कृषी औद्योगिक क्रांती, २२०केव्हीए क्षमतेची वीज केंद्रे, मोठ्या सिंचन योजना, रस्ते, शैक्षणिक व आरोग्य सुविधा आदी सर्व बाबी आज पर्यंत आपल्याच सहकार्याने कार्यरत होऊन या जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकरी व मजूर यांच़े आर्थिक जीवनमान उंचावले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आ. बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे असे आग्रही प्रतिपादन सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष कमलाकर तोडकर, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर जहागीरदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर निशिगंधा कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी मोरे, शुभांगी उबाळे, रोहिणी ढवळे,तसेच झुंजार भांगे पंचायत समिती सदस्य धनाजी जवळगे,  राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, तुकाराम ढवळे, शिवाजी पाटील, दीपक पाटील, विक्रम उरमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments