सारा अली खानने मुंबईत खरेदी केले शानदार ऑफिसमुंबई |

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने मुंबईत एक शानदार ऑफिस खरेदी केले आहे. लोटस डेव्हलपर्सच्या लोटस सिग्नेचर बिल्डिंगमध्ये हे ऑफिस आहे. या ऑफिससाठी साराने नेमके किती पैसे मोजले हे अद्याप समजलेले नाही. पण रिअल इस्टेटमधील तज्ज्ञांच्या मते साराने खरेदी केलेल्या ऑफिसची किंमत 1.01 कोटी रुपये ते 1.57 कोटी रुपये दरम्यान असू शकते. ही फक्त जागेची किंमत असेल आणि त्या किंमतीवर नियमाप्रमाणे टॅक्स लागू होईल, असेही रिअल इस्टेटमधील तज्ज्ञ सांगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे साराने खरेदी केलेले ऑफिस एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील जागा आहे. या ऑफिसचा ताबा साराला 2025 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे.

साराने खरेदी केलेल्या ऑफिसची बातमी व्हायरल झाली आहे. ही बातमी व्हायरल झाल्यापासून साराचे चाहते सोशल मीडियाद्वारे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सारा करत असलेली प्रगती बघून आनंद वाटला, अशीही प्रतिक्रिया तिच्या काही चाहत्यांनी दिली आहे.

 

Post a Comment

0 Comments