करमाळा |
आमचे ऐकले नाही तर आम्ही सर्वजण मिळून तुला ठार मारून उजनीत टाकू, अशी धमकी देऊन शिवीगाळ करत मारहाण करून ३७ वर्षाच्या विधवेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील सोगाव येथे घडला आहे. या प्रकरणात सासू, दीर, जाऊ, नणंद व तिच्या मुलाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीने म्हटले आहे की, २०२१ मध्ये पतीचे निधन झाले. त्यानंतर मुलासह मी सोगाव येथे राहते. गुन्हा दाखल झालेले संशयित मला किरकोळकरणावरून त्रास देत. पतीचे निधन झाल्याने त्यांचा त्रास मी सहन करत होते. ते सतत घालून- पाडून बोलत. पतीचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्यांनी मला ‘जमीन वाटून मिळणार नाही, आम्ही सांगेल तसेच ऐकायचे नाहीतर निघून जा,’ असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. ‘तुझ्या जमिनीतील निघालेले उत्पन्न आम्हाला दे’, असे ते म्हणत होते. ‘मी कष्ट करून माझ्या शेतातील उत्पन्न घेत आहे. मी तुम्हाला देणार नाही,’ असे म्हणल्यानंतर त्यांनी फिर्यादीला मारहाण केली. शिवीगाळ करून त्यांनी धमकी दिली आहे. ‘आमचे ऐकले नाही तर आम्ही सर्वजण मिळून तुला जीव ठार मारून उजनी धरणात टाकून देऊ’ अशी नेमके दिली. त्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments