राहत्या घरी हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या; बार्शी पोलीस ठाण्यात होती हवालदार म्हणून नेमणूक


बार्शी |


ग्रामीण पोलीस दलातील एका ४६ वर्षीय हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार पेठेतील कविता नगर पोलीस लाईन येथे उघडकीस आली आहे. किरण अरुण साळुंखे ( वय ४६ रा. कविता नगर पोलीस लाईन ब्लॉक नंबर ३९, रूम नं. १५०) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह बेडरूम मधील छताच्या पंख्याला लेगिनच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

किरण साळुंखे हे बार्शी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून नेमणूक होते.. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे. दोन दिवसापूर्वी त्यांची पत्नी दोन्ही मुलांना नणंदेच्या घरात सोडून इतर महिला सोबत चारधाम यात्रेकरिता गेल्या होत्या. त्यामुळे ते घरात एकटेच होते. त्यांचा घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. जेल रोडच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयाकडे पाठवून दिले. घटनेची नोंद जेलरोड पोलिसात झाली असून कारण समजले नाही. फौजदार राठोड हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments