दुःखद ! विजेचा शॉक लागून १० वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू


सोलापूर |

 विजेचा शॉक लागून १० वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शांतराज युवराज तल्लोर वय वर्ष १० (रा. उत्तर सदर बझार सोलापूर) असे विजेचा शॉक लागून मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळ पाण्याची मोटार चालू असताना ते बंद करण्यासाठी गेले असता शॉक लागून बेशुद्ध झाल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत आला.

उपचारासाठी सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच शांतराज यास मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.


Post a Comment

0 Comments