धाराशिव शहरात अवैध गुटखा विक्री , इंदिरानगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई



धाराशिव |

गुटखा विक्रीस बंदी असताना, धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरु आहे. शहरातील , इंदीरानगर भागातील एका दुकानात गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच, शहर पोलिसानी छापा मारून गुन्हा दाखल केला आहे.

धाराशिव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की, इंदीरानगर उस्मानाबाद येथील जे के पान मटेरीयल नावाचे दुकानामध्ये एक इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे. यावर पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- जाकेर बाबुलाल तांबोळी रा. उस्मानाबाद असे सांगून त्याच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पथकाने सदर दुकानाची पाहणी केली.

त्यामध्ये रत्ना 3000 तंबाखु पॉकेट, लाल गोवा 300 पॉकेट तंबाखू सिल्व्हर रंगाचे पॉकेट माणिकचंद गुटखा, एमसी तंबाखुचे पॉकीट असा एकुण 84,450 ₹ किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी दुकानात जाकेर यांचे घरामध्ये ठेवलेला 2,89,800 ₹ किंमतीचा माल मिळून आल्याने महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकुण 3,74,250 ₹ किंमतीचा माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारा जाकेर बाबुलाल तांबोळी यांचेविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 आंतर्गत गुरंन 116/2023 व 117/2023 असे दोन गुन्हे धाराशिव शहर पो.ठा. येथे 08.04.2023 रोजी नोंदवला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी- शेख, सपोनि- चव्हाण, सफौ- पुरके, पोलीस हावलदार- शिंदे, गलांडे, पोलीस अंमलदार- स्वामी, जाधवर, चव्हाण महिला पोलीस अंमलदार- साठे, गाढवे यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments