सोलापूर |
लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी राज्यातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना शुक्रवारी ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन परिर्वतन’ वर्ष 2021-22 मध्ये राबविण्यात आले होते.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा घालण्याकरीता व त्याचे समूळ उच्चाटनासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमास पोलीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. त्यांच्या या कार्याची दखल घेत उद्या प्रधानमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार सोलापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्वीकारला..
0 Comments