जळगाव |
मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री नियंत्रण कक्षात बदली केली होती. तसेच रात्री उशिरा त्यांना निलंबित करण्यात आले.
एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. या विरोधात मराठा समाजातील अनेक नेत्यांसह सर्वसामान्यांनी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाईची मागणी केली होती. “मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले याला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलिसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलीस खात्यातून हद्दपार करावी,” अशी छत्रपती संभाजीराजे यांनीही ट्वीटद्वारे मागणी केली होती. या अनुषंगाने रात्री उशीरा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले आहेत.
0 Comments