मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाचा भर चौकात खून ; सीसीटीव्हीवरून तपास सुरू


पुणे |

सरपंचाचा भर चौकात खून झाल्यामुळे मावळ तालुका हादरला आहे. जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे. प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे. प्रवीण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असून ते शिरगाव येथे विद्यमान सरपंच म्हणून नुकतेच निवडून आले आहे.

चांगल्या मतधिक्याने ते विजयी झाले होते. प्रवीण गोपाळे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून शिरगाव चौकात कामानिमित्त आले होते. तेव्हा अचानक त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला. कोयत्याने वार देखील केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. हल्ला केल्यानंतर मारेकरी घटनास्थळवरून फरार झाले आहेत. पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपींचा शोध सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. थेट चौकात लोकप्रतिनिधीचा खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Post a Comment

0 Comments