"जलजीवनच्या निविदा प्रक्रियेची माजी मंत्री सोपल यांनी मागवली माहिती..!"


सोलापूर |

राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल हे अनेक महिन्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते, त्यांच्यासोबत माजी सभापती मकरंद निंबाळकर, विश्वास बारबोले, लतिफ तांबोळी यांच्यासह बार्शी तालुक्यातील सोपल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोपल यांचा जथ्था झेडपीत आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयाकडे वळाला मात्र स्वामी हे कार्यालयात नसल्याने सर्व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे गेले, त्याठिकाणी अर्धा तास चर्चा झाली. 

सर्वजण बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी सोपल यांना घेराव घातला. बऱ्याच महिन्यानंतर आल्याने पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. सोपल म्हणाले, जलजीवन मिशन या योजनेत बराच गोंधळ असून टेंडर प्रक्रियेमध्ये बराच घोळ आहे, बार्शी तालुक्यातील रुई या गावांमध्ये टेंडर होऊन चार महिने झाले वर्क ऑर्डर दिली नाही. कुणाच्यातरी दबावाखाली असे प्रकार विशेष करून बार्शी तालुक्यात होत असल्याचा आरोप त्यांनी केला याची संपूर्ण चौकशी लावावी अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments