करमाळा |
चहामधून एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा होण्याची घटना करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे घडली.यामध्ये चार वर्षांचा मुलगा,दोन तरुण आणि एका प्रौढाचा समावेश आहे.चहामध्ये गोचिड पडल्यामुळे हा प्रकार घडला पसल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्यावर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचार घेत असलेल्या चौघांमध्ये प्रगती विनोद केंगार (वय वर्षे २८),विनोद भीमराव केंगार (वय वर्षे ३२),इंदुबाई भीमराव केंगार (वय वर्षे ५५) व सोनाली विनोद केंगार (वय वर्षे ४),सर्वजण राहणार शेलगाव वांगी) यांचा समावेश आहे.केंगार कुटुंबीय चहा प्यायल्यानंतर सर्वांनाच चक्कर आली.सर्वांना एकाच वेळी का त्रास होतोय,याची माहिती घेतल्यानंतर चहा तयार करताना चुकून त्यात गोचिड मारण्याचे औषध पडले गेले होते.त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर करमाळा येथील सरकारी रुग्णालात सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.त्यानंतर,नातेवाईक शशीकांत जायभाई यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले.या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.
0 Comments