बार्शी शहरातील सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याच्या टोळीला दोन वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून केले हद्दपार
बार्शी |

बेकायदेशीर रित्या बार्शी शहरात तसेच तालुक्यात विशाल विठठल रणदिवे याने टोळी निर्माण करून स्वतः तसेच एकटयाने तरी कधी टोळीच्या साथीदारा सोबत गुन्हे करून दहशत व भय निर्माण केले होत. त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे कडून प्रस्ताव प्राप्त होता.
             
बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे तसेच पुणे जिल्हयात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, अपरहरण करणे, खंडणी मागणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या विशाल रणदिवे व टोळीतील 05 इसमाना मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयातून दोन वर्षाकरीता हददपार केले आहे.   
 
            
टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांची नावे - टोळी प्रमुख 1) विशाल विठठल रणदिवे, टोळी सदस्य सदस्य 2) बाबा सुरेश खंडागळे, 3) नारायण मच्छिंद्र लोंखडे, 4) विनोद उर्फ विनायक श्रावण पवार, 5) विक्रम रमेश पारडे, सर्व रा. झाडबुके मैदान, बार्शी , ता.बार्शी, जि. सोलापूर, 6) नागेश उर्फ बक्शा हिरा गवळी, रा. लहुजी वस्ताद चैक, बार्शी, ता. बार्शी असे सदस्य आहेत.  
            
तरी याव्दारे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नमुद ह§पार इसम हे त्यांना हदद्पार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबत ची माहिती तत्काळ पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे.
            
सदरचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे सोलापूर ग्रामीण यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहे.  अपर पोलीस अधिक्षक, हिंमत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. सुहास जगतपा, पो.नि. श्री. संतोष गिरीगोसावी, स.पो.नि. तोरडमल, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील व बार्शी शहर पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी कारवाईत संयुक्तपणे कामकाज केला आहे.

Post a Comment

0 Comments