पिकविम्यासाठी पांगरी येथील शेतकऱ्याचे तहसील समोर उपोषण


बार्शी |

बाधित पंचनामेच्या क्षेत्रात विमा कंपनीकडून बदल केल्यामुळे कमी प्रमाणात विमा मिळाल्याचा आरोप बार्शी तालुक्यातील पांगरी येथील शिवाजी तुळशीराम गोडसे (वय ५९)या शेतकऱ्याने केला आहे, आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आंबेडकर जयंती ची तहसील कार्यालयाला सुट्टी असताना ही त्यांचे आंदोलन सुरू आहे.

२०२२ मध्ये त्यांनी ९ हेक्टर ७० आर चा विमा उतरवला होता, परंतु त्यांना फक्त तीन हेक्टर क्षेत्राचा विमा मिळाला. मूळ पंचनाम्यातील कागदपत्रे बदलले असल्याचा आरोपही शिवाजी गोडसे यांनी केला आहे त्यामुळे पिक विमा कमी मिळाला. पंचनामेची कागदपत्रे बदलणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. 

शिवाजी गोडसे हे गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत, शेतकऱ्याची तब्येत खराब चाललेली आहे त्यांच्या जीवित अशी काही बरे वाईट झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर पांगरी ते मंत्रालय पायी जाऊन मुख्यमंत्र्याला गाऱ्हाणे सांगणार आहे. त्वरित न्याय द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदन देऊन त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments