येरमाळा यात्रेत चिमणी पाखरं नावाचा सोरट जुगार , २१ जणांविरुद्ध कारवाई



येरमाळा |

येरमाळा येथील येडाई तथा येडेश्वरी देवीची यात्रा दि.६ आणि ७ एप्रिल रोजी पार पडली. या यात्रेत चिमणी पाखरं नावाचा सोरट व स्ट्रायकर जुगार बिनदिक्कतपणे सुरु होता. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या २१ इसमाविरुद्ध कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये येरमाळा येथील येडेश्वरी देवी चैत्री यात्रा परिसरात अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याकरीता दि. 08.04.2023 रोजी यात्रे मध्ये विशेष पथक गस्तीस होते. पथकास गोपनीय माहिती मिळाली की,यात्रा परिसरात काही इसम सोरट व स्ट्रायकर नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमुद ठिकाणी 21.00 ते 22.30 वा. दरम्यान एकुण 03 ठिकाणी छापे टाकले असता तेथे एकुण 21 इसम हे सोरट व स्ट्रायकर नावाचा जुगार खेळत असताना पथकास मिळून आले. नमुद इसमाकडून एकुण -16,310 ₹ रोख रक्कम व 06 मोबाईल जप्त केले.असुन नमूद इसमाविरुध्द येरमाळा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत 03 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

 जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.08.04.2023 रोजी येथे पो.ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी तुळजापूर येथील- बाबा काळे, तर कोथाळवाडी, ता. कळंब येथील फुलचंद शिंदे हे दोघे येडेशवरी यात्रा आमराई चौक येथे, सुरट जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,030 ₹ रक्कम बाळगलेले, तर शिंगोली, ता. कळंब येथील- बापु बप्पा पवार हे आमराई परिसरात ब्रेक डान्स पाठण्याजवळ येरमाळा येथे चिमणी पाखर नावाचे सुरट जुगार चालवण्याच्या साहित्यासह 560 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे.

सदरची कामगिरीपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सपोनि कासार, सायबर सेल,पोलीस हावलदार- शेख, पोलीस अंमलदार-कलाल, मोरे, सहाने, राठोड, रहिज, शेख, ताड, मंगनाळे, मायचारी सर्व नेगणुक पोलीस मुख्यालय यांचे पथकाने केली आहे

Post a Comment

0 Comments