वाशी | कूपनलिका खोदताना पाईप डोक्यात पडून एकाचा मृत्यू‎वाशी |

 स्वत:च्या घरासमोर कूपनलिका‎ खोदत असताना पाइपची कडी‎ सटकून तो खाली अंगावर पडल्याने‎ एक जणाचा जागीच मृत्यू झाला. ही‎ घटना भूम तालुक्यातील पखरूड येथे‎ रविवारी (दि.१९) रात्री ९.३० वाजेच्या‎ सुमारास घडली.‎

पखरुड, ता. भुम येथील- राजेंद्र मुरलीधर वरबडे, वय 45 वर्षे, हे त्यांच्या घरासमोर बोरवेल घेत होते. दि.19.03.2023 रोजी 20.45 वा. सु. बोर मशीन चालक नामे- शिवा नेसन रा. मातुर रामस्वामीकम, ता आरुनंतांची राज्य तामीलनाडू याने त्याच्या ताब्यातील बोरची मशीन हयगयाने व निष्काळजीपणाने चालवून बोरच्या मशीनवरील पाईप बदली करताना ब्रेकर मध्ये असलेला पाईप घसरुन राजेंद्र यांच्या डोक्यात पाडून राजेंद्र वरबडे यांना गंभीर जखमी करुन त्यांचे मृत्युस कारणीभुत झाला आहे. अशा मजकुराच्या मयताचे भाऊ- संजय मुरलीधर वरबडे यांनी दि. 20.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments