बस, टेम्पो आदी वाहनातील डिझेल चोरणाऱ्या चोरट्यास अटक ; १ लाख ६१ मुद्देमाल केला हस्तगत


धाराशिव |

भोसले हायस्कुल, धाराशिव येथील- बसचालक-धनंजय कुंडलिक बिटे हे २१ मार्च रोजी ११ वाजता ते २२ मार्च रोजी ५.३० वा पुर्वी तेर बसस्थानक येथे बस उभी केली असता बसमधील अंदाजे १३०२०₹ किंमतीचे डिझेल १४० लि. तसेच तेर येथील -विकास रामकृष्ण भोरे यांच्याही टेम्पो मधील  अंदाजे ४,६५० ₹ किंमतीचे डिझेल ५० लि.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या धनंजय बिटे यांनी दि. २२ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३७९ अंतर्गत ढोकी गुन्हा नोंदवला आहे. 

सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ईसम नामे विशाल ऊर्फ भांमड्या प्रकाश बालाजी काळे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब हा मस्सा येथे उभा आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  सदर बातमी मिळालेल्या ठिकाणी आलो असता तेथे एक इसम चारचाकी गाडी जवळ दिसला त्यास त्याचे नाव गाव व त्याचे ताब्यातील गाडी बाबत विचारले असता सदरची गाडी ही माझ्या मालकीची आहे असे सांगुन  त्याने त्याचे नाव- विशाल ऊर्फ भांमड्या प्रकाश बालाजी काळे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब असे सागिंतले.


त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याने सागिंतले की, मी व माझे साथीदार श्याम ऊर्फ आप्पा अजिनाथ शिंदे, रा. मांडवा, ता. कळंब, रामा शंकर काळे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यांनी मिळून तेर येथील बसस्थानक मध्ये उभी असलेल्या बस मधील व तेरचे रस्त्यावरील टेम्पो मधील डिझेल चोरी केलेले आहे अशी कबुली दिली. मुद्देमाल ७० लि. डिझेल दोन कॅन्ड सह मधील डिझेल विकून मिळालेले  रोख रक्कम ५,२००₹ व  गुन्ह्यात वापरलेली ईडीको गाडी सह असा एकुण १,६१,५०० ₹ किंमतीच्या मालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव पोलीस ठाणे ढोकी, आनंदनगर व उमरगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- मनोज निलंगेकर, सफौ-काझी, पोलीस हावलदार- सय्यद, औताडे, काझी, पठाण, पोलीस अंमलदार- रविंद्र आरसेवाड, महिला पोलीस अंमलदार- राठोड, चव्हाण  यांच्या पथकाने केली आहे

Post a Comment

0 Comments