धाराशिव शहरात बसच्या धडकेत एकाचा मृत्यू ; बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


धाराशिव |

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून महात्मा गांधी नगरकडे पायी जाणाऱ्या ५७ वर्षीय व्यक्तीला एसटी बसने धडक दिली. या झालेल्या अपघातात त्या व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, महात्मा गांधी नगर, धाराशिव येथील युसूफ ईस्माईल कुरेशी, (वय ५७) हे धाराशिव येथे शिवाजी चौकामधुन पायी महात्मा गांधी नगर येथे जात होते. दरम्यान बस क्र एमएच २० बी. एल. १६५२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस ही निष्काळजीपणे चालवल्याने युसूफ कुरेशी यांना धडक दिल्याने युसूफ हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा मुलगा मोहसीन युसूफ कुरेशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम २७९,३३७,३३८,३०४ (अ), अंतर्गत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments