सोलापूर | कार घ्यावयाची आहे; माहेरून पाच लाख घेऊन ये,म्हणत पत्नीला उपाशी ठेवत केला छळ


सोलापूर |

कार व सोने घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी चार जणांवर  जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेहा प्रज्योतीपती वास्टर (वय २७, रा. रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घटनेने विवाहित महिलांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटली आहे.सोलापुरात दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या असल्याचे माहिती समोर आली आहे.पीएसआय मोतेवार याबाबत अधिक तपास करत आहेत.पीडित महिलेला चारचाकी वाहनासाठी राहत्या घरी कोंडून ठेवण्यात आले व उपाशी ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पीडित विवाहित महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेत पोलीस स्टेशन गाठले व पतीसह चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.


पाच लाखांसाठी विवाहित महिलेला हैद्राबाद येथे कोंडून ठेवले-
फिर्यादी नेहा यांचे प्रज्योतीपती यादगिरराव वास्टर याच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर पीडित विवाहित ही पतीसोबत हैदराबाद येथील घरात राहावयास होती.लग्नाच्या काही दिवसांनंतर विवाहित महिलेस पैशाचा तगादा लावून कौटुंबिक हिंसाचार सुरू केला.माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये,अशी मागणी करत,विवाहित महिलेला हैद्राबाद येथील घरात कोंडून ठेवण्यात आले.त्याला उपाशी ठेवण्यात आल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.

चारचाकी वाहन व सोन्यासाठी छळ-
संशयित आरोपी पती प्रज्योतीपती यादगीरराव वास्टर,दिर बलभीम यादगिरराव वास्टर, सासरे यादगिरराव विश्वनाथ वास्टर, नणंद वंदना सुनील भोरावत (सर्व रा. जोशीवाडा, जियागुंडा, हैद्राबाद ) यांनी फिर्यादी विवाहित महिला नेहा यास तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, योग्य मानपान केला नाही. तुझ्या वडिलांनी दोन तोळ्याचे सोने दिले आहे. आणखी सोने आणण्यासाठी व तसेच कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केला. शिवाय फिर्यादी नेहा हिला उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक जाचहाट केले, अशा आशयाची फिर्याद नेहा वास्टर यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील चौघांवर  जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतेवार करत आहेत.

Post a Comment

0 Comments