विवाह नोंदणी साइटवरून तरुणीची फसवणूक ; दोन लाखाला गंडवले


नागपूर |

खासगी दुकानात काम करणाऱ्या तरुणीची विवाह नोंदणी साइटवर ओळख झालेल्या तरुणाने फसवणूक केल्याची घटना उमरेड हद्दीत घडली. विवाह नोंदणी साइट वर ९ ते १३ मार्चदरम्यान तिची ओळख तरुणाशी झाली. त्याने तरुणीशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. तरुणी जिथे काम करते तेथील सर्व आर्थिक व्यवहार ती करीत असल्याचे आरोपीला माहीत होते. याचा फायदा घेत आरोपीने मी तुझ्यासाठी काही भेटवस्तू पाठवत आहे. त्या आयकर आणि इतर विभागांत अडकल्या आहेत. 

त्या सोडविण्यासाठी काही पैसे लागतील असे सांगितले. तरुणीने मालकाच्या बँक खात्यातून चार वेळा एक लाख ८७ हजार रुपये काढून आरोपीच्या दोन बँक खात्यांमध्ये पाठवले. मात्र भेटवस्तू आल्या नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. उमरेड पोलिसांनी आरोपी रवी शर्मा आणि मनोज कुमारविरुद्ध कलम ४२०, भादंवि सहकलम ६६ डीआयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments