राहुल भड यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान

बार्शी |
     
गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमचे संस्थापक राहुल भड यांना "एक हात मदतीचा" या संस्थाच्या वतीने "समाज रत्न पुरस्कार", ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रवींद्र मोरे म.न.से ठाणे शहर अध्यक्ष, भास्कर चव्हाण संस्थापक अध्यक्ष, निलेश चव्हाण माथाडी कामगार नेते, हेमलता चौधरी चर्मकार ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्ष या मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार दिला गेला.
    
  महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्यांना  २० व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन राहुल भड यांना समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. भड यांना यापूर्वीही परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार (नळदुर्ग), गुणिजन रत्नगौरव पुरस्कार (मुंबई), राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार (पुणे), प्रतिभा संग्राम पंढरी गौरव पुरस्कार (पंढरपूर), ग्राहक समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार (मोहोळ), स्व. जयवंत (दादा) कटमोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार (पिंपरी), जिविका फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार, वृध्द सेवा गौरव पुरस्कार (कळंब), समाजरत्न पुरस्कार (रत्नागिरी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार (आळजापूर), लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्यावतीने पुरस्कार, आर्य समाज पिंपरी पुणे यांच्या वतीने पुरस्कार अशा विविध संघटना, संस्थांच्या वतीने राहुल भड यांना पुरस्कार मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments