‘सबसे कातील गौतमी पाटील’ रायगड ग्रुपच्या लावणी महोत्सवासाठी झळकले बॅनर


महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नाव चर्चेत आहे. तसेच हे नाव सुद्धा चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गौतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकजन गौतमी पाटील चा लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करतात. तिच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात. अशातच गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव नाशिक जिल्ह्यातील निफाड इथे आयोजित करण्यात आला आहे.

निफाड च्या रायगड ग्रुपच्या माध्यमातून लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लावणी महोत्सव निफाड शहरातील बस स्टँडशेजारी मार्केट यार्ड परिसरात होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गौतमी पाटील म्हटल्यावर तुफान गर्दी होणारच, म्हणून या महोत्सवासाठी तिकीट ठेवण्यात आले आहेत. यात 200 रुपये, 500 रुपये, एक हजार रुपये असा लावणी महोत्सवाचा तिकीट दर असणार आहे.

सायंकाळी साडे चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याचे समजते. त्यामुळे लावणी महोत्सवाला चांगलीच गर्दी होणार असल्याचे दिसते. मात्र कार्यक्रमात गर्दी एवढी होते की, पोलिसांना आवरणे कठीण होऊन बसते. आता नाशिक मध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील येणार असल्याने तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होत आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.

Post a Comment

0 Comments